Monday, September 12, 2011

पुन्हा एकदा !


नाते लपलेले
जरासे जपलेले
शांत झोपलेले
बाळासारखे !

सगळे काही न बोललेले
सल असे जाणवलेले
हवेहवेसे भोगलेले
विरहासारखे !

उद्याची मी वाट पाहतो
सूर्याआधी तुला पाहतो
कसे ते मी न सांगतो
कस्तुरीसारखे !

का ही हुरहूर अजून दाटते
कसेकसेसे मला वाटते
तशीच तू  आता आठवते
स्वप्नपरीसारखी !
                               - उन्मेष

1 comment:

  1. mast ch..

    सगळे काही न बोललेले..सल असे जाणवलेले..हवेहवेसे भोगलेले..विरहासारखे too good :-)

    ReplyDelete