हस्ताचा पाऊस बरसला असा
मनाला सुद्धा भिजवलं त्याने
हृदयाच्या आत जाऊन
अश्रू गाळले मनाने सांगून लोचनांना
आतून चिंब मी अन बाहेर कोरडा
माझेच मन आता मला फसवून गेले
मोकळे कितीही केले तरी भरून मन का येते
कुठून येतात हे न आटणारे भावनांचे झरे
कुठून येतात ही आठवणींची रहाट गाडगी
आणि कितीही खोदत गेलो तरी "का"
का या मनाच्या विहिरीचे पाणी खारट लागते ?
उभा आडवा चिरत गेलाय
हा हस्ताचा पाऊस काहीतरी
"आड" मनाला भिडून गेलाय
काहीतरी देऊन गेलाय
न कळणारं न उमजणारं
पण तरीहि भरून पावलंय मन
पुन्हा मोकळं होणारं
- उन्मेष
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा