सोडून जाताना देश माझा काहीच मला वाटलं नाही
भावना सगळ्या जणू कोरड्या झाल्या होत्या
रडायची परवानगी तर मीच मला नाकारली होती
खूप गोष्टी पहिल्यांदा होत होत्या बहुतेक
सोडून जाताना वेश माझा काहीच मला वाटलं नाही
"कसं दिसेल" हा प्रश्न स्वतःला विचरला नाही
नखशिखांत नवीन कपडे , बूट, ब्लेझर सूट
इतकं सगळं घालून दिवाळीत सुद्धा नटलो नव्हतो
आयुष्यातला पहिला विमान प्रवास , तोही एकटा
भीती खरच वाटली नाही, पण खरंच ..
उत्सुकता, आकांक्षा , संवेदना, उद्दिष्टे असे अनेक जड शब्द
मनात घर करून होते
राहतं घर सोडून जाताना काहीच मला वाटलं नाही
त्या भिंती, ती गॅलरी, तिथे उभं राहून पाहिलेला तो पाऊस..
आईच्या हातची आयती कॉफी, हे आणि असं सगळं
आठवणींमध्ये आहे पण तरीहि
डोळे अश्रूंना वाट करून देण्यास तयार नाहीत
खूप स्वार्थी आहेत हे डोळे आणि डोळेच काय...
सगळीच इंद्रिये आणि त्यांना नाचवणारं माझं मन सुद्धा
कशाच्या शोधात साता -समुद्रापलीकडे निघालंय ?
कुणास ठाऊक!
तथाकथित उच्च शिक्षण घ्यायला ,
नवीन माणसं , भाषा , संस्कृती यांचा अनुभव घ्यायला,
खरं म्हणजे स्वतःचे चोचले पुरवायला
एकदा तरी मनसोक्त फिरायला
एकदा तरी व्यक्त व्हायला
एकदा तरी उन्मुक्त व्हायला
एकदा तरी स्वतःसाठी जगायला...
थोडक्यात "सुख" नावाची गोष्ट शोधायला
बंधने आणि जबाबदाऱ्या सोडून जाताना काहीच मला वाटलं नाही
कित्ती सहज गृहीत धरल्या गोष्टी सगळ्या
दगड केला मनाचा, झापडं लावली डोळ्यांना,
कुठेतरी मनात घालमेल होती
पण यशाची चाहूल ती घालमेल सहज पचवून टाकते
दीड वर्षाचा हा प्रवास, विमानात आठवतोय
अस्वस्थ, बेचैन, अनिश्चित वातावरणात केलेला झगडा
आणि पटलं
याच साठी केला होता उभा अट्टाहास !
निभावून न्यायचे आहे आता इथे सारे काही
पुन्हा मिळणार काय आहे ..
अस्वस्थ, बेचैन, आणि अनिश्चित वातावरण
आणि यात वाढीव असेल ते एक थेंबभर समाधान !
(ही मुक्तछंद कविता माझ्या सर्व शिक्षकांना अर्पण )
- उन्मेष

बेष्ट...(सर्वप्रथम) अखेर 'यमक' सोडलेस हे पाहून फार फार आनंद झाला :-)...
उत्तर द्याहटवाही कविता "केवळ अप्रतिम" झालेली आहे !!!
सर्व कष्टांचे केलेले हे चीज आहे..'याचसाठी केला अट्टाहास' अगदी सार्थ+समर्पक आहे..
"व्यक्त आणि उन्मुक्त" होण्याच्या अनेक संधी आता समोर आहेत..थेंबभराच्या समाधानाचे नक्कीच आनंदसागरात रुपांतर होईल अशी आशा..
ATB