हिमा, तुला पावसाची सर नाही रे
पांढरा शुभ्र असलास तरी बरं नाही रे
हलके हलके सहज तू रंग सगळे चोरलेस
चांदणे रातीचे दिवसा इथे पेरलेस
पण तरीसुद्धा खिडकी माझी धूसर नाही रे
हिमा, तुला पावसाची सर नाही रे...
गोठवतोस तू अंग आणि आटवतोस तू पाणी
आठवतोस तू मोसमातील नाताळाची गाणी
पण, थरथर, चिंब, ओली माती असं काहीच नाही रे
हिमा, तुला पावसाची सर नाही रे...
इंद्रधनुष्य नाही , अशी अभ्रांची ही दाटी
पांढरपेशा जगात तुझ्या हिरवाईशी कट्टी
क्षणभंगुर रूप तुझे , होणार तुझे पाणी
तुझ्याकडे फारसा अवसर नाही रे
हिमा, तुला पावसाची सर नाही रे...
-उन्मेष
पांढरा शुभ्र असलास तरी बरं नाही रे
हलके हलके सहज तू रंग सगळे चोरलेस
चांदणे रातीचे दिवसा इथे पेरलेस
पण तरीसुद्धा खिडकी माझी धूसर नाही रे
हिमा, तुला पावसाची सर नाही रे...
गोठवतोस तू अंग आणि आटवतोस तू पाणी
आठवतोस तू मोसमातील नाताळाची गाणी
पण, थरथर, चिंब, ओली माती असं काहीच नाही रे
हिमा, तुला पावसाची सर नाही रे...
इंद्रधनुष्य नाही , अशी अभ्रांची ही दाटी
पांढरपेशा जगात तुझ्या हिरवाईशी कट्टी
क्षणभंगुर रूप तुझे , होणार तुझे पाणी
तुझ्याकडे फारसा अवसर नाही रे
हिमा, तुला पावसाची सर नाही रे...
-उन्मेष
yaweles pan bhari zalie..
उत्तर द्याहटवा2nd last kadwa particularly awadla..aksharsh: saglya pawsachi athwan karun gela..though i hate untimely rains to the core, somehow it made me (also) feel that something is missing..
'Pandharpesha jagat' cha "shot" jamlaaaay ;-)
Keep it up \m/