२७ जुलै २०१३
परदेशी शिकायला आल्यानंतर ट्रेक न केल्याला ऑगस्ट २०१३ मध्ये एक वर्ष पूर्ण झाले असते, ते मला होऊ द्यायचे नव्हते. अॅमस्टरडॅमला सपाट जमिनीमुळे टेकडी दिसायची खोटी (म्हणजे खोटी सुद्धा टेकडी दिसायची नाही ), त्यामुळे डोंगर , पर्वत शब्द जणू डच शब्दकोशात (बहुतेक भाषेत सुद्धा) नाहीतच. सीअॅटलला आल्यानंतर hiking ची संधी मला सोडायची नव्हती. सीअॅटल हे मस्तपैकी डोंगरांनी वेढलेले असल्यामुळे विशेषतः समर मध्ये इथे अनेक ट्रेकर्स hiking साठी येतात.
मी सुद्धा कंपनी मधल्या उत्साही (आणि सक्षम ) hikers ना हेरले आणि आमचा चौघांचा ग्रुप रॅटलस्नेक च्या ट्रेक साठी तयार झाला : Colin (ब्रिटीश चायनीज), Ruixuan (चायनीज, याला मी रिझवान असे नाव ठेवले आहे ), आणि Huapeng ( चायनीज, याचे टोपण नाव / इंग्रजी नाव 'मॅट'). आम्ही सगळेच इंटर्न असल्याने आणि इंटरेस्टेड असल्याने ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळी (साडे -आठ वाजता ) निघालो.
रॅटलस्नेक ही डोंगररांग सीअॅटल च्या पूर्वेला (नेमके बघितल्यास आग्नेय दिशेला) ३८ मैलावर आहे. रॅटलस्नेक तलाव हा सुद्धा आजूबाजूच्या परिसरात प्रसिद्ध आहे. ३८ मैल अंतर कापायला आम्हाला फारसा वेळ लागला नाही. रॅटलस्नेक लेकचा रमणीय परिसर काही क्षण तरी डोळ्यांच्या पापण्यांना लवू देत नाही.
![]() |
रॅटलस्नेक लेक |
तलावाच्या दुसऱ्या बाजूस रॅटलस्नेक Ledge (खडकाळ कंगोरा) दृष्टीस पडतो आणि तोच आमच्या hike चा पहिला टप्पा होता :
![]() |
Rattlesnake Ledge (from the lake) |
![]() |
रॅटलस्नेकला जाणाऱ्या वाटेवर |
माणसांच्या सम प्रमाणात कुत्री सुद्धा ट्रेकला आली होती (आणली गेली होती) . वाटेत लुडबुड करत आणि पायात कडमडत असलेल्या कुत्र्यांमुळे वाट अवघड नसली तरी तिच्यावरून चालणे अवघड बनले होते. अधून मधून आम्ही एखादा कडा सापडला की कुत्र्यांची वाट सोडत होतो आणि कॅमेराला बॅगेतून बाहेर वाट करून देत होतो:
![]() |
वणवा ! |