२७ जुलै २०१३
परदेशी शिकायला आल्यानंतर ट्रेक न केल्याला ऑगस्ट २०१३ मध्ये एक वर्ष पूर्ण झाले असते, ते मला होऊ द्यायचे नव्हते. अॅमस्टरडॅमला सपाट जमिनीमुळे टेकडी दिसायची खोटी (म्हणजे खोटी सुद्धा टेकडी दिसायची नाही ), त्यामुळे डोंगर , पर्वत शब्द जणू डच शब्दकोशात (बहुतेक भाषेत सुद्धा) नाहीतच. सीअॅटलला आल्यानंतर hiking ची संधी मला सोडायची नव्हती. सीअॅटल हे मस्तपैकी डोंगरांनी वेढलेले असल्यामुळे विशेषतः समर मध्ये इथे अनेक ट्रेकर्स hiking साठी येतात.
मी सुद्धा कंपनी मधल्या उत्साही (आणि सक्षम ) hikers ना हेरले आणि आमचा चौघांचा ग्रुप रॅटलस्नेक च्या ट्रेक साठी तयार झाला : Colin (ब्रिटीश चायनीज), Ruixuan (चायनीज, याला मी रिझवान असे नाव ठेवले आहे ), आणि Huapeng ( चायनीज, याचे टोपण नाव / इंग्रजी नाव 'मॅट'). आम्ही सगळेच इंटर्न असल्याने आणि इंटरेस्टेड असल्याने ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळी (साडे -आठ वाजता ) निघालो.
रॅटलस्नेक ही डोंगररांग सीअॅटल च्या पूर्वेला (नेमके बघितल्यास आग्नेय दिशेला) ३८ मैलावर आहे. रॅटलस्नेक तलाव हा सुद्धा आजूबाजूच्या परिसरात प्रसिद्ध आहे. ३८ मैल अंतर कापायला आम्हाला फारसा वेळ लागला नाही. रॅटलस्नेक लेकचा रमणीय परिसर काही क्षण तरी डोळ्यांच्या पापण्यांना लवू देत नाही.
रॅटलस्नेक लेक |
तलावाच्या दुसऱ्या बाजूस रॅटलस्नेक Ledge (खडकाळ कंगोरा) दृष्टीस पडतो आणि तोच आमच्या hike चा पहिला टप्पा होता :
Rattlesnake Ledge (from the lake) |
रॅटलस्नेकला जाणाऱ्या वाटेवर |
माणसांच्या सम प्रमाणात कुत्री सुद्धा ट्रेकला आली होती (आणली गेली होती) . वाटेत लुडबुड करत आणि पायात कडमडत असलेल्या कुत्र्यांमुळे वाट अवघड नसली तरी तिच्यावरून चालणे अवघड बनले होते. अधून मधून आम्ही एखादा कडा सापडला की कुत्र्यांची वाट सोडत होतो आणि कॅमेराला बॅगेतून बाहेर वाट करून देत होतो:
वणवा ! |
तासाभरातच आम्ही रॅटलस्नेक Ledge वर पोचलो. तेथे अगोदरच पन्नासेक लोकयेऊन बसले होते. त्यातील निम्मे लोक खाण्यात गुंग झाले होते. या खडकावरून तलावाचे विहंगम दृश्य सुंदर दिसत होते :
रॅटलस्नेक तलाव (रॅटलस्नेक Ledge वरून ) |
भुयारातून पलीकडे गेल्यावर दिसणारी दरी |
जंगलातून जाणारी एक वाट |
कोलिनबरोबर लंडन च्या गप्पा आणि त्यावरच्या मॅटच्या (चायनीज) इंग्रजीमधील कमेंट्स : ज्ञानात बरीच भर पडत होती. रिझवान वरवर शांत वाटत असला तरी तो मधेच एखादी खोचक टिप्पणी (ती सुद्धा चायनीज अक्सेण्ट ) करून हशा मिळवत होता .
तास दोन तासात एक बऱ्यापैकी दमवणारी चढण पार करून अखेर East Peak गाठले. वरती फक्त एक बाक आणि एक टाॅवर होता. नाही म्हटलं तरी आमचा अपेक्षाभंगच झाला होता. तिथल्या भर्राट वाऱ्याने आमचा श्रमपरिहार मात्र चुटकी सरशी केला. चौघांना बसून खायला अशी जागा तेथे नसल्याने परतीच्या वाटेवर निघालो , जंगलातच सोईचे दगड बघून बैठक मांडली आणि आपापले डबे संपवले. द्राक्षे खाल्ली. परतताना उतार असल्याने गुडघ्यांची पर्वा न करता पळत सुटलो. आता वर येणाऱ्या लोकांची (आणि पर्यायाने कुत्र्यांची) संख्या अजूनच वाढली होती. काही हौशी ट्रेकर्स आपापल्या बाळांना पाठुंगळीला घेऊन चढत/उतरत होते.
एका आड-वाटेवर असणाऱ्या खडकावर महत्प्रयासाने चढून फोटो काढून घेतले, माझ्या नंतर आलेल्या आसुस नावाच्या मुलाने माकड-उड्यांचे प्रात्यक्षिक दाखवत त्या खडकावर येणे किती सोपे आहे हे दाखवून मला खजील केले:
खडतर खडक |
रॅटलस्नेक ट्रेक - ग्रुप |
Bhaarii unmya... sahich re
उत्तर द्याहटवापरदेशात राहूनही मराठीवर एवढं प्रेम सतत अंगी बाळगणारा तुज सम तूच रे! मनापासून अभिमान आणि कौतुक!
उत्तर द्याहटवाब्लॉग आवडला! सतत लिहित राहा!
mast jamlay bhau..snaps excellent..keep trekking.."Ek warsh purn hou dyayche nawhte" he awesome :)
उत्तर द्याहटवाBtw, tithlya trek madhe daba takla ki nai? :P :D
Unmya kadak re... Lihinyachi tich style ahe re ajun... Bhari vatala vachun,, Keep posting :)
उत्तर द्याहटवाkamal ahe unmesh:) as usual uttam likhan...
उत्तर द्याहटवाThanks all for appreciation!
उत्तर द्याहटवा