या वेळची थंडी थोड़ी वेगळी असणार आहे
धुक्यात हरवलेली ती मला गवसणार आहे
पहाटे पहाटे मी तिला टेकडीवर बोलावणार आहे
एक दिवस तरी मी त्यासाठी लवकर उठणार आहे
सूर्यसुद्धा त्या दिवशी थोडा उशिरा उगवणार आहे
या वेळची थंडी थोड़ी वेगळी असणार आहे
ठरलेल्या आमच्या त्या झाड़ापाशी दुपारी ती येणार आहे
न विचारता मग मी तिला कुठेतरी नेणार आहे
न बोलताच मी तिच्याशी खूप काही बोलणार आहे
या वेळची थंडी थोड़ी वेगळी असणार आहे
नदीकाठी गप्पा मारत संध्याकाळी आम्ही बसणार आहे
बोलता बोलता उगाच ती थोडीशी मग रुसणार आहे
मग खांद्यावर माझ्या डोके टेकून नेहमीप्रमाणे हसणार आहे
आता मात्र सूर्य जरा लवकरच मावळणार आहे
गुलाबी थंडीचा अर्थ मी तिला सांगणार आहे
या वेळची थंडी थोड़ी वेगळी असणार आहे
धुक्यात हरवलेली ती मला गवसणार आहे
-उन्मेष
अक्षरशः अंगा वर काटे आले!
उत्तर द्याहटवातू महान आहेस उन्मेष!! seriously!!!
Peacocks [Mor, मोर] of Morachi Chincholi [मोराची चिंचोली]
क्या बात है... मस्त... खरंच वेगळी झाली असणार "ती" थंडी!
उत्तर द्याहटवा