तुझ्याशी फोनवर बोलताना
अंगावर उगाचच कटा येतो
Hello म्हणता म्हणताच
चुकून ओठावर टाटा येतो
तुझ्याशी फोनवर बोलताना
चेहरा होतो लाल गुलाबी
"का फोन केलास ?" विचारताच "काम होता जरा"
असा म्हणतो मी हजरजबाबी !
तुझ्याशी फोनवर बोलताना
अनाम हुरहुर लपवावी लागते
मनातली गुपिते सांगायची जबाबदारी
मैत्रिणीवर सोपवावी लागते
तुझ्याशी फोनवर बोलताना
कितीही अंतर मी चालू शकतो
मला अंतर देऊ नकोस
अशी शपथ मी तुला घालू शकतो ?
तुझ्याशी फोनवर बोलताना
कनात आणतो मी पंचप्राण
वाणी तुझी जणू रागिणी
अन ओठ शब्दरत्नांची खाण
तुझ्याशी फोनवर बोलताना
आणतो वारा तुझ्या अस्तित्वाचा सुवास
होशील का तू माझ्या या
धडधडणारया हृदयाचा श्वास !
तुझ्याशी फोनवर बोलताना
अभावितपणे स्फुरते एखादे नवकाव्य
वाटते तुझ्यासाठी चांदण्यांचा गजरा करावा
किंवा असेच काहीतरी भव्यदिव्य!
तुझ्याशी फोनवर बोलताना
बाकीची कामे इतर वेळी
आणा-भाका घेऊ आपण
एखाद्या तळयाकाठी कातरवेळी
तुझ्याशी फोनवर बोलताना
आठवते एखादे गाणे गोड
कडवी सुद्धा त्याची गोड
तुझ्या बाहुपाशात असलेल्या
झाडाचे मी खोड !!
तुझ्याशी फोनवर बोलताना
तुझाही आवाज कधी जाणवतो कापरा
गळ| माझा दाटून येतो
आणि डोळे भिजवतात कोपरा
तुझ्याशी फोनवर बोलताना
कधीतरी घ्यावाच लागतो निरोप
सहवासाचा वटवृक्ष होऊ दे
आपल्या फोन-भेटींचे हे रोप !!!
-- उन्मेष जोशी
anubhawache bol aahet kakanche!!!:P:D...ho na re?
उत्तर द्याहटवाek number! it's a real life experience - yaaa, i've had it !
उत्तर द्याहटवाभारी रे उन्मेष भाऊ! आवडली...फुल हवाच करून टाकलीये फोनवर बोलताना...
उत्तर द्याहटवाअसाच काही काव्यपंक्ती माझ्या संग्रहातील,
तुझ्याशी फोनवर बोलताना,
माझा मी ना रहातो
होउन भ्रमर दिवाना ,
गुंजन तुजभोवती अन
तव मकरंद
टिपाया बघतो...
तुझ्याशी फोनवर बोलताना
एक जिव बावरा होतो,
आवाज तुझा ऐकताना,
स्पर्शाचा भास होतो....
तुझ्याशी फोनवर बोलताना,
का हसे चन्द्रमा गगनी,
तो ही कुणाला स्मरातो
जणू ऐकून आपुली गा-हाणी...
sorry to add again
उत्तर द्याहटवातुझ्याशी फोनवर बोलताना
मी कायम खोटा खोटा हसत असतो
विरहाच्या अनुभवत
हळू हळू तुटत असतो
करिता तू लवकर ये
नाहीतर माझे उरतील फक्त तुकडे
अन्न नाही पाणी नाही
तूच दिसतेस जिकडे तिकडे
क्षणभरही आता मला विरह
हा आता सहन होई
स्थिताप्रन्या होऊन तू
का ग माझा अंत पाही?????