तुझी वाट पाहत बसलो मी दिवसभर घरी
त्या दिवशी तू माझ्याकडे आली नाहीस तरी
आदल्या दिवशी उगाचच जागत राहिलो
तरीही सकाळी लवकर उठलो
पहाटे पहाटे तू येणार नाहीस
हे माहीत होते जरी ...
तुझी वाट पाहत बसलो मी दिवसभर घरी
चहा आणि नाश्त्याकडे मुळीच नव्हते लक्ष
आईने माझ्याकडे टाकला एकाच कटाक्ष
म्हणाली मला 'काय, आज कुठे आहे स्वारी ?'
तुझी वाट पाहत बसलो मी दिवसभर घरी
सणासुदीच्या दिवशी तुला बोलावले होते मुद्दाम
न येऊन तु माझ्याशी का वागलीस उद्दाम ?
जरी नंतर फोन करून म्हणाली असशील सॉरी
तुझी वाट पाहत बसलो मी दिवसभर घरी
दुपारची शांतता मला खायला उठली
सूर्याची पिले भिंतीवर नाचू लागली
बाल्कनी आताशा चांगलीच तापू लागली
तिथे बसणारया चटक्यांची लज्जर होती न्यारी
तुझी वाट पाहत बसलो मी दिवसभर घरी
माझ्या मनावरील मळभ आले आकाशात दाटून
ढग वाकुल्या दाखवू लागले एकमेकांना खेटून
खट्याळ पावसाच्या बाहेर पडत होत्या सरी
तुझी वाट पाहत बसलो मी दिवसभर घरी
कातरवेळचा अंधार वाटला अधिकच काळ| कुट्ट
आपल्या नात्याची वीण कधी होणार घट्ट
प्रतिक्षेचे ओझे मनाला वाटू लागले भारी
तुझी वाट पाहत बसलो मी दिवसभर घरी
त्या रात्री जेवण गेलेच नाही मला
गच्चीवर जाउन सैरभैर झालो थोडा
काहीतरी सांगत होत्या मला दिशा चारी
आकाशात तुझा चेहरा बघून मनाला आली तरतरी
तू केंव्हाच आली होतीस हे पटले मला खरोखरी
तुझी वाट पाहत बसलो मी दिवसभर 'घरी'
- उन्मेष
shabd rachana bhari aahe..
उत्तर द्याहटवातू महान आहेस उन्मेषा!!!
उत्तर द्याहटवाMexican Prickly Poppy [Argemone Mexicana, Satyanashi, सत्यानाशी]
unmya.. hi jara vadhiv kavita aahe ;-)
उत्तर द्याहटवासणासुदीच्या दिवशी तुला बोलावले होते मुद्दाम
न येऊन तु माझ्याशी का वागलीस उद्दाम ?
aani achanak mala bhetla Hussain Saddam... :D :D :D :D :D lolzzz...