तो:
भिजताना चिंब रजनी
कवेत माझ्या लाजुनी
मनात तुझ्या काय ते
कळले नाही अजुनी
ती:
माझ्यासाठी मदन तू
शृंगाराचे सदन तू पाऊस तू अन अब्द तू
खट्याळ सारे शब्द तू
ती:
अभ्रदूत सारे जमले वरती
जलसायक ते आम्हा भिजवती
पातळ माझे मलाच बिलगती
अंग माझे मलाच लाजवती
तो:
पाऊस जरी मी मेघ मी
विद्युल्लता तू तेज तू
मी लहरी वारे मोसमी
मम रोषहारी झुळूक तू
ती:
तुफानासमोर झंझावाती या
जवळ तुझ्या मला घे तू
लपवून ठेव मला आणि
अस्तित्वच माझे हो तू
तो:
काया प्रिये, तुझी ही झेलून या पावसा
शिरशिरी शिरते अशी प्रसरती नसा नसा
मी हरवतो मग स्वतः अन एकांत हा असा
माझ्यातल्या तुला या विसरेन मी आता कसा !
- उन्मेष
jamlay!!!!! :) too good..!
उत्तर द्याहटवाha ha ha khup bhari, hasalo ya sathi ki na baghatach .. vachale ani ase ka lihalay he na kalalyane ..
उत्तर द्याहटवाTikone Ganesh